मनू भाकरची चाहत्यांनी उडवली खिल्ली

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये दोन कांस्य पदकांची कमाई करणारी मनू भाकर. मनूने या ऐतिहासिक कामगिरीसह प्रसिद्धी मिळवली. तेव्हापासून तिला अनेक कार्यक्रमांमध्ये आमंत्रित करण्यात आले. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन ऑलिम्पिकपटू चर्चेत राहत असते. आता मनूने एक अनोखी पोस्ट करुन सर्वांचे लक्ष वेधले, मात्र काही वेळातच तिला आपली पोस्ट डिलीट करावी लागली. मला सांगा, मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? धन्यवाद, असे मनू भाकरने एक पोस्ट करत म्हटले. याशिवाय तिने पुरस्कार, खेलरत्न आणि ऑलिम्पिक्स असे काही हॅशटॅगदेखील वापरले. पण, काही वेळातच मनूने ही पोस्ट डिलीट केली.
खरे तर नेटकर्‍यांनी मनू भाकरला संबंधित पोस्टवरुन ट्रोल केल्याने तिला पोस्ट डिलीट करावी लागली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी मनूची खिल्ली उडवली.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला मनू भाकरने पहिले पदक मिळवून दिले. 10 मी. महिलांच्या पिस्तूल प्रकारात तिने कांस्य पदक पटकावले. मनू भाकरने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्य पदक जिंकून एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला.25 मीटर महिलांच्या पिस्तूल प्रकारात पदक जिंकून मनूने पदकाची हॅटट्रिक मारली.

Exit mobile version