| महाड | प्रतिनिधी |
महाड या ऐतिहासिक भूमीमध्ये आज 95 मनुस्मृती दहन स्मृतिदिन साजरा करण्यात आला. 27 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून भारतीय महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिले. स्मृतिदिनाबरोबर मानव मुक्तीदिन व स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेला बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर उपस्थित होत. डॉ. बाबासाहेबांची शिकवण आचरणात आणून सन्मानाने जगा लाचारी पत्करू नका असे ते म्हणाले.

या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धजन पंचायत समितीतर्फे क्रांतिभूमी मैदानामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर विकास वंचित दलित राष्ट्रीय महिला मंडळ यांच्यातर्फे 25 डिसेंबर भारतीय महिला दिन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या मुख्य संयोजिका डॉ.प्रमिला लीना संपत, पुष्पा गेडाम, पंचशीला चाळके यांच्यासह राज्यातून आलेल्या असंच महिला परिषदेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
महाड शहरातील क्रांती भूमी येथील प्रांगणामध्ये बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेबांनी समाजामध्ये वावरताना स्वाभिमानाने वागण्याची शिकवण दिली. आज समाजाची दिशाभूल करून आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे अनेक जण आहेत, त्यांच्यापासून सावध राहण्याची आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.
या सभेला अशोक जाधव, दीपक साळवी, बाबू गायकवाड, सखाराम जाधव, चंद्रमणी तांबे, पवार सुशीला जाधव, सुप्रिया शिर्के, मर्चंडे ताई, अनंत कांबळे, सुप्रिया साळवी, अपर्णा लोखंडे, गायकवाड, संघमित्रा गायकवाड, जितेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो अनुयायी अभिवादन सभेला उपस्थित होते सकाळपासून चवदार तळे क्रांतीस्तंभ राष्ट्रीय स्मारक या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थिती लक्षणीय होती. चवदार तळे येथील आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.