वक्तृत्व स्पर्धेत मानवी गायकर विजेती

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील उडदवडे येथील मानवी भास्कर गायकर हिने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत विजेतेपदाचा बहुमान पटकावला आहे. को ए सो आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा नुकत्याच अलिबाग येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत मेंहेंदळे हायस्कूल रोहा येथे पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मानवी गायकर हिने इ.5 वी ते 7 वी गटात विषयानुरूप आपले विचार व्यक्त करताना संपूर्ण संस्थेतील शाळांमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तिच्या या सुयशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे. विभागातील सामाजिक कार्यकर्ते महेश तुपकर यांच्या पुढाकाराने मानवीचा या यशाबद्दल तिच्या उडदवणे येथील राहत्या घरी यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत युवा कार्यकर्ते नरेश गायकर, धनराज शिंदे, किरण तुपकर आदींसह मानवीच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version