| मुंबई | वृत्तसंस्था |
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या शनिवारी व रविवारी (25, 26 नोव्हेंबर) बंद ठेवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या लोणावळा-पुणे विभागात खडकी-शिवाजीनगरदरम्यान विविध कामे करण्यात येणार असल्यामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.
अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्या वेगळ्या मार्गावर वळवल्या आहेत. 25 नोव्हेंबर 2023 रोजी सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द झाली आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस या गाड्या सुध्दा रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी काही गाड्यांना विलंब होणार आहे. बेंगळूरु -सीएसएमटी उद्यान एक्स्प्रेस सोलापूर विभागात 2 तास 40 मिनिटे उशिराने येईल. बंगळूर-गांधीधाम एक्स्प्रेस पुणे-सातारा विभागात एक तासानंतर नियमित केली जाईल. रविवारी सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस मुंबई विभागात अडीच तास उशिराने येईल.
आज-उद्या अनेक रेल्वे गाड्या रद्द!

Kochi, Kerala, India -March 2, 2021 a train moving with electric support through the indian railway track