मराठी पत्रकार आरोग्य तपासणी दिनानिमित्त शिबीर

। खोपोली । प्रतिनिधी ।
देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा आज 83 वा वर्धापन दिन राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा होत आहे. त्याचे औचित्य साधून खालापूर प्रेस क्लबने खोपोली येथील स्पंदन हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद पाटील यांच्या सहकार्याने पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरासाठी खोपोली खालापुर तालुक्यातील 35 हुन अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला.
यावेळी एस एम देशमुख, भाई ओव्हाळ, गोकुलंदास येशिकर, प्रशांत गोपाळे ,बाबू पोटे,अमोल पाटील,जयवंत माडपे,अरुण नलावडे, प्रवीण जाधव अनिल वाघमारे, अंकुश मोरे, दिलीप पवार, महेबूब जमादार, एस टी पाटील, संदीपओव्हाळ, दिनेश पाटील, रवी मोरे,समाधान दिसले, हनुमान मोरे, संतोषी म्हात्रे, सारिका सावंत, अर्जुन कदम,आकाश जाधव, तय्याब खान, नवज्योत पिंगले,संतोष गोतारने, किशोर साळुंखे, योगेश वाघमारे, शेखर परब, प्रसाद अटक यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.

Exit mobile version