। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील शेकडो हून अधिक नागरिकांनी अदानी स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढत या मीटरला तीव्र विरोध दर्शविला आहे. म्हसळा तालुका संघर्ष समितीने स्मार्ट मीटर विरोधात धडक मोर्चा काढत शहरातील महावितरण कार्यालयावर जाऊन महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे असल्याचे सांगत म्हसळा महावितरण विभागाचे उप कार्यकारी अधिकारी एस.जी. पालशेतकर यांना हजारो निवेदन अर्ज देऊन हे मीटर आम्ही वापरणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच, आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत, उद्या जर ही मागणी मान्य न केल्यास 5 हजार नागरीक रस्त्यावर उतरतील, असा इशारा म्हसळा तालुका संघर्ष समितीने महावितरण अधिकाऱ्यांना दिला आहे.