। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. यामध्ये परप्रांतीय कामगारांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. प्रामुख्याने त्यात बांगलादेशी घुसखोरांचा समावेश असल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागातील घर मालकांनी अशा परप्रांतीयांना जागा भाड्याने देताना अथवा त्यांच्याशी व्यवहार करताना कायदेशीर रित्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत यापूर्वी अनेक वेळा करण्यात आले होते. दरम्यान, हे बांगलादेशी घुसखोर उरण पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत कोंबिंग ऑपरेशन केले तर नक्कीच उरणमधील बांगलादेशी घुसखोरी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.