। खारेपाट । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथे श्री बहिरीदेवाच्या यात्रेनिमित्त भव्य उंच काट्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत (नेवेरेव काठी) मरीदेवी प्रसन्न मंडळ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर द्वितीय क्रमांक श्री बापूजी प्रसन्न मंडळ व तृतीय क्रमांक श्री विठ्ठल प्रसन्न हे मंडळ विजेते ठरले. या स्पर्धेत अनेक मंडळांचा सहभाग होता. या स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी श्री बहिरीदेव मंडळाचे अध्यक्ष तथा सिने अभिनेते व माजी खासदार राज बब्बर यांचे सचिव हरिचंद्र पाटील, राजेश पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील म्हात्रे, भगवान म्हात्रे, डॉ. मनोज पाटील, महेश पाटील व गावातील पंच कमिटी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उंच काट्यांच्या स्पर्धेत मरीदेवी मंडळ विजेता
