पनवेलमधून विवाहिता बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

कामावर गेलेली एक विवाहिता अद्याप घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रुकसाना अजू शेख (23) रा. गावदेवी झोपडपट्टी, नावडे कॉलोनी, उंची 4.6 फूट, रंग सावळा, बांधा मध्यम असून, तिच्या अंगावर निळा सलवार कमीज व सफेद ओढणी तसेच काळा बुरखा घातला आहे. तिच्या दोन्ही हातांवर काळे डाग आहेत. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा सपोनि राजेंद्र जाधव 9987118765 यांच्याशी सपंर्क साधावा.

Exit mobile version