। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील खंडाळा येथील महिलेसह तिचा लहान मुलगा बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पतीने केलेल्या तक्रारीनुसार अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 च्या सुमारास अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील 27 वर्षीय विवाहित महिला तिच्या 3 वर्षीय मुलासह गायब झाली. सदर महिलेचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने तीच्या पतीने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सदर महिलेला अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने फुस लावून फिर्यादिच्या संमतीशिवाय फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार एस.पी.पाटील करीत आहेत.