| रसायनी | वार्ताहर |
सासरच्या माणसांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी कराडे खुर्द येथील विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात सासरच्या माणसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडे खुर्द येथील अंकिता गणेश दाभणे (27) हिला तिच्या सासरची माणसे गेली आठ वर्षे शारीरिक व मानसिक त्रास देत होती. या त्रासाला कंटाळून कराडे खुर्द येथील राहत्या घरी अंकिता दाभणे हिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी अंकिताचा भाऊ कृणाल सुनील जाधव याने रसायनी पोलीस ठाण्यात अंकिताचा पती गणेश रघुनाथ दाभणे, रघुनाथ दाभणे (सासरे), कमल दाभणे (सासू), कविता दाभणे (नणंद), जगदीश दाभणे (दीर) सर्व राहणार कराडे खुर्द यांच्याविरोधात तक्रार केली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे अधिक तपास करीत आहेत.