। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
मालवण तालुक्यातील गोळवण परिसरातील जयश्री बाळकृष्ण खरात (27) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.







