| उरण | वार्ताहर |
उरण तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदार संघातील जन माणसांच्या समस्या, त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार (दि. 4) सायंकाळी ठिक 5-30 च्या सुमारास द्रोणागिरी नोड (नवीन शेवा) येथील मैदानावर शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित जनसमुदायाला, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती माजी आ. मनोहर भोईर यांनी दिली.
उरणमध्ये जनसंवाद मेळावा
