हेदवलीत राखीतून वृक्षारोपण प्रक्रिया

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या हेदवली शाळेमध्ये महाराष्ट्र राज्य निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून राखीचे महत्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या राख्या या बांबूपासून बनविल्या आहेत. त्या प्रत्येक राखीमध्ये एका झाडाची बी आहे. अशा सात झाडांच्या बिया सात प्रकारच्या राख्या आहेत. या राख्या कुठेही टाकल्या तरी त्यामधून झाड उगवणारच आहे. याप्रसंगी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ठाणे जिल्हा अध्यक्ष सुचिता सकपाळ, हर्षदा कडू, दीपावली सपकाळ, रेणुका सोनवणे, रेखा पुजारी, मेधा मांडेकर, तानाजी भोर्डे आदी उपस्थित होते.

Exit mobile version