। मुंबई । वृत्तसंस्था।
मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवारी (दि.6) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. सकाळी 7 च्या सुमारास एका घरात सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होती की या स्फोटात सात ते आठजण जखमी झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चेंबूर कॅम्प परिसरात गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे बाजूच्या दोन-तीन दुकानांच्या भीती पडून नुकसान झाले. तर रस्त्यावरून जाणारे काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच, या दुर्घटनेत अनेक गाड्यांचेही नुकसान झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांसह मुंबई अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहे.
चेंबूरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट
