। महाड । प्रतिनिधी ।
जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या महाड तालुक्यातील कोथेरी धरणा करिता शिरगाव परिसरामध्ये आणलेल्या प्रोजेक्टमधील एचडीपीई प्रकारच्या पाईपला आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या वणव्यामध्ये मोठ्या संख्येने पाईप जळून खाक झाले आहेत.
या भीषण आगीमध्ये विभागाची हजारो रुपये किमतीची पाईप भक्षस्थानी पडले असून, या संदर्भात अधिक तपशील गोळा करण्याचे काम विभागाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. मागील वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून या धरणाचे काम सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी पाईपलाईन टाकण्याकरिता शिरगाव परिसरामध्ये हे पाईप एकत्रित करून ठेवण्यात आले होते. या परिसरात अज्ञात व्यक्तींकडून लावण्यात आलेल्या तरवा या प्रकारातून सदरची आग लागण्याची भीती व्यक्त केली आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. महाड नगरपरिषद एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
कोथेरी धरण प्रकल्पाच्या पाईपला भीषण आग
