| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रुग्णालयातील 190 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, ही आग इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले. प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून रुग्णालयातील सुरक्षा उपायांबाबत चौकशी केली जात आहे.