रिलायन्स कंपनीतून साहित्य चोरीला

। रसायनी । प्रतिनिधी ।

पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीच्या ‘पी. टी. एस. स्टोअर्स ‘मधून अडीच लाख रुपयांचे महागडे साहित्य चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत नोकरीला असलेले तक्रारदार प्रतीक जितेंद्र भिंगारदिवे (32) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी कंपनीच्या स्टोअर्समधून कोणतीही परवानगी न घेता तांब्याची कॉपर ट्युब्स (10 किलो वजन, किंमत 10,000 रुपये), कॉपर वाइंडिंग केबल (23 किलो वजन, किंमत 23,000रुपये) आणि डिचार्ज रॉड – 6 फूट लांबीचे एकूण 7 नग (किंमत 2,17,000 रुपये) एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गदमले पुढील तपास करत आहेत.

Exit mobile version