| रसायनी | प्रतिनिधी |
भारत सरकारची रसायनी येथील एच. आय. एल.(हिल)इंडिया लिमिटेड कंपनीच्या आवारात चोरी करणाऱ्या आठ चोरांना रसायनी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीला चोरट्यांनी एच. आय. एल. कंपनीच्या आवारात प्रवेश केला. त्यांनी 21,000 रुपये किमतीचे कॉपर वायरचे दोन बंडल आणि कापलेले तुकडे (प्लास्टिकचे काळे आवरण असलेले एकूण 30 किलो वजनाचे) चोरले. तसेच, एका जुन्या टेम्पोमधून 5,600 रुपये किमतीची आठ किलो वजनाची कॉपर वायर (प्लास्टिकचे आवरण असलेली) चोरून नेत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एकूण 26,600 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यात दीप भगवान सोनावळे, रा. खाने आंबिवली, ता. खालापूर, राज किशोर जगदीश वर्मा, रा. लोहप, ता. खालापूर, अकबर मोहम्मद जावेद खान रा. मानखुर्द गोवंडी, मुंबई मूळ उत्तर प्रदेश, बकरीदी उर्फ अमील शाकीर अली शेख, रा. मानखुर्द मंडल जनता नगर, गोवंडी, मुंबई मूळ उत्तर प्रदेश, मोहम्मद अल्ताफ शेख, रा. मानखुर्द मंडल जनता नगर, गोवंडी, मुंबई मूळ उत्तर प्रदेश, अदनान जाहीर खान, रा. मंडाला इंदिरानगर, गोवंडी, मुंबई मूळ उत्तर प्रदेश, अमन मेश सरोज, रा. 30 फिट रोड, साईबाबा मंदिर जवळ, गोवंडी मूळ उत्तर प्रदेश, अभिषेक रामू चौरसिया, रा. मानखुर्द, तीस फिट रोड, साईबाबा मंदिर जवळ, गोवंडी मूळ उत्तर प्रदेश. या घटनेतील टेम्पो घेऊन पळून गेलेल्या एका अज्ञात इसमाचा पोलीस शोध घेत आहेत. या आठ जणांवर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर हे करीत आहेत.





