| रसायनी | प्रतिनिधी |
मोहपाडा बाजारपेठेमध्ये निसर्ग पॅथोलॉजी गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देण्याचे काम हनुमंत लभडे करीत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अनेक ठिकाणी कॅम्प बसवून विनामूल्य, तर काही वेळेस अल्प दरात रक्त तपासणी करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले. आज दिवसेंदिवस आजार फैलावत असताना रुग्णांची वाढती संख्या पाहता दुसरी शाखा निसर्ग डायग्नोस्टिक सेंटर लॅटीट्यूट अपार्टमेंट एचडीएफसी बँक व सीएनजी पंपासमोर मोहपाडा येथे रामदास महाराज पाटील-संस्थापक अध्यामिक शिक्षण संस्था गुरुकुल महड यांच्या हस्ते फीत कापून अनावरण करण्यात आले. निसर्ग पॅथोलॉजी तसेच दुसरी शाखा निसर्ग डायग्नोस्टिक सेंटर या दोन्ही रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार आहे. या अनावरणप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहावयास मिळाली. या शाखेच्या शुभारंभाच्या निमित्ताने हरिपाठ, भजन यांचे आयोजन करण्यात आले होते.





