। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई विमानतळ बाधितांचे प्रश्न सोडविण्याकामी अग्रेसर असणारे कोबडभूजाचे माजी सरपंच विजय शिरढोणकर यांच्या मातोश्री शांताबाई शिरढोणकर(82) यांचे अल्पशा आजाराने नुकताच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. शांताबाई यांचा दशक्रिया विधी लांगेश्वर मंदिर मोरावे येथे ता तेरावे मंगळवार दिनांक 18 जानेवारी रोजी राहत्या घरी म्हणजे सत्यम हाईट्स,12 वा मजला, प्लॉट नंबर 165, सेक्टर 44, सी-वूड (प), नेरूळ, नवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.







