माथेरान क्रिकेट स्पर्धेत मुकद्दर बनला सिकंदर

माथेरान | प्रतिनिधी |

माथेरान मध्ये शुभम गायकवाड मित्र परिवार यांच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 टेनिस बॉल क्रिकेटचे आयोजन येथील प्रसिध्द वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल याठिकाणी करण्यात आले होते.या स्पर्धेत मुकद्दर क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले
साखळी पध्दतीने खेळ घेण्यात आले होते एकूण सोळा संघांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी तसेच रोख रक्कम देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीच्या वेळी बंड्या बॉईज संघावर मात करून मुकद्दर क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले तर उप विजेतेपद बंड्या बॉईज संघाला मिळाले. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या वतीने प्रथम क्रमांकास रोख रक्कम 31000 रुपये तर उप विजेत्या संघाला कमिटी कडून 15000 रुपये आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या.
या बक्षिस वितरणअ सोहळ्यासल काँग्रेस नेते मनोज खेडकर,सुनील शिंदे, भास्कर शिंदे, राजू गायकवाड, अनिस शेख, अमोल चौगुले,अशोक कदम,किशोर सोनावळे,सुशांत नाईकडे ,हिमांशू सोनावळे, ढोले,यांसह नेरळ कर्जत येथील मान्यवर मंडळींसह गावातील सर्व संघांचे पाठीराखे उपस्थित होते. समालोचन मयुरेश कदम, अनिल नाईकडे, मंगेश मोरे यांनी केले.

Exit mobile version