पावसानंतर माथेरान काळोखात

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरानमध्ये वादळी पावसानंतर अवकाळीसह गारपीट पाऊस आला. त्यात वादळी पावसाने अनेक झाडे कोसळत होती. त्यामुळे माथेरानमध्ये तब्बल दोन दिवस वीज गायब होती. वीज गायब असल्याने पाणीदेखील माथेरानमध्ये पोहचले नाही आणि त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटक देखील माथेरानकडे फिरकत नाहीत अशी स्थिती झाली आहे.

माथेरानमध्ये गारपीट ग्रस्त पाऊस आणि अवकाळी सोबत वादळी वार्‍याने माथेरान जंगलात असंख्य झाडे कोसळली आहे. त्यामुळे माथेरान घाटात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत आणि त्यानंतर वीज गायब झाली होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने माथेरानमध्ये जवळपास सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.वीज नसल्याने माथेरानचा पाणीपुरवठा येथील बँकिंग व्यवहार, नेटवर्क आदींवर परिणाम झाला. त्याचा फटका येथील नागरिकांसह व्यापारी आणि पर्यटकांना सहन करावा लागला. माथेरानमध्ये वीज आणि त्यानंतर पाणीदेखील गायब असल्याने माथेरानमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असून माथेरानमध्ये पर्यटनासाठी असंख्य पर्यटक भेट देत आहेत. त्यात येथे अनेक करमणुकीचे कार्यक्रम असल्याने पर्यटकांची वर्दळ माथेरानमध्ये पाहवयास मिळाली. मात्र (दि.13) आणि (दि.14) मे रोजी येथे आलेल्या अवकाळी पावसात गारपीट झाली असून जवळपास अर्धा तासात 23 मिलीमीटर पाऊस झाला.

सायंकाळी साडेपाच वाजता येथील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा परिणाम दाथेरानदधील ऑनलाईन चालणारी हॉटेल्स आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने बँकिंग व्यवस्था अस्ताव्यस्त झाली. नेटवर्क नसल्याने एटीएम मशिन्स, बँकिंगचे अर्थव्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. हॉटेल्सची सर्व आर्थिक गणिते कोलमडली. मोबाईलची सर्व नेटवर्क नॉटरिचेबल झाली. सोबतच ई-रिक्षा चार्ज नसल्यामुळे त्या बंद अवस्थेत थांबल्या आहेत. वीजेबरोबर पाणी येत नसल्याने माथेरानमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे.

Exit mobile version