माथेरान प्रवासी कर संकलन ठेक्याचा लिलाव

बाईक हॉस्पिटॅलिटी कंपनीने मिळविला ठेका

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरात प्रवेश करणार्‍या पर्यटकांकडून शहरात प्रवेश करण्यासाठी प्रवासी आणि स्वच्छता कर आकारला जातो. प्रवासी कर संकलन करण्याचा ठेका लिलावात दि बाईक हॉस्पिटॅलिटी कंपनीने मिळविला आहे. या कंपनीने स्पर्धक दोन कंपन्यांना मागे टाकत 13 कोटी 21 लाखांना हा प्रवासी कर संकलनाचा ठेका मिळविला.

2024 ते 2026 या कालावधीत माथेरान शहरात पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांकडून प्रवासी आणि स्वच्छता कर वसूल केला जातो. या निधीमधून माथेरान नगरपरिषद शहरातील विकासकामे करीत असतात. माथेरान पालिकेकडून मागील दीड वर्षे प्रवासी कर संकलन करीत होते. त्यामुळे पालिकेने जुलै 2024 मध्ये निविदा काढली होती. त्यांनतर या निविदेनुसार 29 ऑगस्ट रोजी लिलाव सुरू झाला. हा ठेका मिळविण्यासाठी माथेरान पालिकेकडे विकास कन्स्ट्रक्शन, फायरविंग इन्फ्राकॉन सर्व्हिसेस आणि दि बाईक हॉस्पिलिटी या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. बोलीमध्ये बाईक हॉस्पिटॅलिटी ही कंपनीने लावलेली 13 कोटी 20 लाख 80 हजार ही बोली सर्वाधिक ठरली. त्यामुळे या कंपनीला माथेरान नगरपरिषदेमधील प्रवासी कर संकलनाचा ठेका मिळविला.

माथेरान नगरपरिषदेमधील प्रवासी कर संकलनाचा ठेका 2019 मध्ये बाईक हॉस्पिटॅलिटी कंपनीने मिळविला होता. मात्र, ठेका अर्धवट सोडल्याने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करताना 72 लाख 68 हजारांची थकीत रक्कम निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कंपनीकडील 61 लाख रुपये अनामत रक्कम असल्याने ती जप्त करून थकीत रक्कम 11 लाख रुपये शिल्लक राहिली होती.मात्र 2024 ते 2026 या कालावधी साठी ठेकेदार निश्‍चित करण्यासाठी निविदा निघाल्यानंतर बाईक हॉस्पिटॅलिटी कंपनीने थकीत 11 लाख आणि व्याजाची दोन लाख अशी 13 लाखांच्या रकमेचा धनादेश जुलैअखेरीस पालिकेकडे दिला आणि प्रवासी कर निविदेत सहभाग घेतला. त्यामुळे पालिकेने या कंपनीला लिलावामध्ये सहभागी करून घेतले होते.

अंकुश ईचके,
रोखपाल

Exit mobile version