माथेरानच्या विद्यार्थिनीचा बदलापूर येथे सन्मान

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमधील विद्यार्थिनीने बदलापूर येथील स्वातंत्र्यसैनिक गोमाजी रामा पाटील प्रतिष्ठानकडून झालेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून, बदलापूर येथे तिला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिरमध्ये इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकणारी नम्रता रोहिदास क्षीरसागर हिने 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतिदिन आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड येथे झालेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये तिच्या निबंधाची निवड करण्यात आली. त्याबद्दल बदलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात तिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिच्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील आणि शिक्षकांनी तिचे कौतुक केले. तसेच माथेरानवासियांकडूनदेखील सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Exit mobile version