लॉकडाऊन होऊ नये यासाठी माथेरानकर सरसावले

। माथेरान । प्रतिनिधी |
महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना व काँग्रेस माथेरानकराच्या मदतीला धावून आले. काल महाराष्ट्र शासनाने कोरोना संदर्भात जारी केलेल्या नियमावलीत पर्यटनस्थळ पूर्णपणे बंद असे सांगण्यात आले आहे. त्या प्राश्वभूमीवर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची महापौर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन देणेत आले. या निवेदनातून माथेरान हे पर्यटनस्थळ किमान 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवणेस मुभा मिळावी व तसे र्निदेश मा जिल्हाधिकारी रायगड यांना व्हावेत अशी विनंती करण्यात आली. या प्रसंगी शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज खेडकर, उपशहरप्रमुख प्रमोद नायक, काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदे, वनसमिती अध्यक्ष योगेश जाधव, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version