। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे गावातील मथूराबाई आळसाजी पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय 105 होते . मथूराबाई पाटील या वयाच्या 97 वर्षांपर्यंत लग्न कार्यात सुंदर आवाजात धवला गाण्याचे काम करीत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कातळपाडा गावावर शोकांतिका पसरली. त्याच्यावर कातळपाडा गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामस्थांनी सेनेटायझर, मास्क व सुरक्षित अंतर ठेवून पार्थिवाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मथुराबाई ह्या सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांच्या आजी होत्या. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून त्यांचे दशविधी कार्य 12 जानेवारी रोजी त्यांच्या रहाता घरी कातळपाडा येथे होणार आहते. त्यांच्या पश्च्यात त्यांची मुलगी, भाऊ, सून, नातवंडे, नातसूना, पणतू असा मोठा परिवार आहे.
मथूराबाई काळाच्या पडद्याआड
