पेणमध्ये मटक्याचा धंदा जोरात

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरासह वडखळमध्ये पुन्हा एकदा मटका माफिया डोकेवर काढताना दिसत आहे. पेण शहरातील कवंडाळ तळा, नंदिमाळ नाका, धरमतर रोड, अंतोरा फाटा, कोळीवाडा नाका या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू असुन, खादीच्या आर्शीवादामुळे तसेच खाकीला न जुमानता हा मटक्याचा अवैध्य धंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पडद्या मागून या धंद्याला कुणाचा आर्शीवाद आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर वडखळमध्ये गांजा, दारू, अवैध्य भंगार माफीया यांची भर असताना आता मटका सुद्धा तेजीत चालू असल्याचे बोलले जात आहे. येथील बोरी फाट्यावर भुषण नामक व्यक्ती हा अवैध्य मटक्याचा धंदा चालवत असून, त्या बाबत काही खाकीच्या मंडळींना सुद्धा माहित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध कारवाई होत नसल्याने पेणसह वडखळमध्ये मटका तेजीत सुरू असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

Exit mobile version