दुखापतीमुळे मयांकची पहिली कसोटी मुकणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला सोमवारी सरावादरम्यान खेळताना डोक्यावर चेंडू आदळल्यामुळे दुखापत झाली. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याला तो मुकणार आहे.

सरावात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने टाकलेल्या उसळत्या चेंडूपासून स्वत:चा बचाव करताना मयांकच्या डोक्यावर चेंडू आदळला. हॅल्मेट घातलेले असूनही चेंडू जोरात डोक्यावर लागल्यामुळे मयांकची ‘कन्कशन’ चाचणी करण्यात येणार आहे, असे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले. भारत-इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार असून शुभमन गिलच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या साथीने मयांकला सलामीवीर म्हणून प्रथम पसंती देण्यात आली होती. मात्र आता के. एल. राहुलला संधी दिली जाऊ शकते.

Exit mobile version