तालुका विकास पत्रकार मंचाकडून ब्लँकेटचे वाटप
| पनवेल | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने पनवेल परिसरातील 75 निराधार ज्येष्ठ नागरिकांना गुरुवार (25 ऑगस्ट) रोजी पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची ऊब असा आगळावेगळा कार्यक्रम संपन्न झाला.
तालुक्यातील स्नेह कुंज आधार गृह, नेरे येथील 30 निराधार ज्येष्ठ नागरिक, शुभम सेवालय वृद्धाश्रम येथील 20 निराधार ज्येष्ठ नागरिक, वरलेश्वर वृद्धाश्रम, नेरे येथील 12 निराधार ज्येष्ठ नागरिक व साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था नवीन पनवेल येथील 13 निराधार ज्येष्ठ नागरिकांना मायेची ऊब म्हणजेच ब्लँकेट व तसेच ताट, वाटी, गडू अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी पनवेल तालुका विकास पत्रकार मंच्याचे अध्यक्ष माधवराव पाटील, सल्लागार संजय सोनावणे, मंदार दोंदे, संजय कदम, अविनाश कोळी, विवेक पाटील, मयूर तांबडे, राजू गाडे, अनिल कुरघोडे, प्रवीण मोहकर, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष स्वराज सोनावणे, अक्षय शार्दूल, सुनील राठोड आदी पत्रकार, संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मंदार दोंदे यांनी केले.