मॅकमोहन हुले नव्या रेकॉर्डसाठी सज्ज

। पाली /गोमाशी । वार्ताहर।
रायगडचा सुपुत्र मॅकमोहन हुले आणखी नव्या रेकॉर्डसाठी हिमालयातील सर्व शिखर सर करण्याचा मानस आहे. तसेच जून, जुलै महिन्यात युरोप खंडातील माऊंट एलब्रूस या जगातील सात शिखरामधील उंच असणार्‍या शिखरावर जाण्याची संधी मिळाली आहे पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या मोहिमेसाठी 2 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे त्यासाठी मला समाजातील दानसुर व्यक्ती ,संस्था कडून आर्थिक मदतीची गरज आहे.आपण केलेली मदत मी गिर्यारोहन मोहिमेसाठीच वापरेल . ज्यांना मला मदत करायची आहे त्यांनी खालील दिलेल्या बँकेचे नंबर आणि गुगल पे नंबर वर मदत करावी असे जाहीर आवाहन करत आहे.

हिमालयामध्ये जगातील सर्वात उंच पर्वतांचा समावेश आहे आणि ते त्यांच्या उंचावरील उंच, उंच-बाजूची दातेरी शिखरे, दर्‍या आणि अल्पाइन हिमनदी, खोल नदीचे घाट,आणि हवामान, वनस्पती, प्राणी यांचे विविध पर्यावरणीय संबंध प्रदर्शित करणार्या उंच पट्ट्यांच्या मालिकेसाठी ओळखले जातात.त्यातीलच जगातील उंच सात शिखर आहेत ही सर्व शिखर येत्या काळात सर करण्याचा मानस आहे. – मॅकमोहन हुले, गिर्यारोहक

Exit mobile version