कामोठेत सराईत आरोपीला अटक
। पनवेल । प्रतिनिधी ।
अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ड्रग्ज तस्कराला अटक कामोठेतून अटक केली आहे. त्याच्याकडे 3 लाख 60 हजाराचे 8 ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळून आले आहे. अब्दुल खालिद अब्दुल रशीद शेख (34) असे आरोपीचे नाव आहे. ड्रग्ज तस्कर सराईत गुन्हेगार असून, 2012 मध्ये त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने कामोठेत सापळा रचला होता. यावेळी संशयित तरुण ड्रग्ज घेऊन त्याच्या राहत्या घरी गेल्याचे समजले. त्यावरून सेक्टर 34 येथील मानसरोवर कॉम्प्लेक्समधील घरावर पथकाने छापा टाकला व त्याला ताब्यात घेतले. अब्दुल शेख याच्यावर 2012 मध्ये कळंबोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. यावेळी झडतीमध्ये घरात 8 ग्रॅम एमडी मिळून आले. त्याची किंमत 3 लाख 60 हजार रुपये असून, हा एमडी त्याने गोवंडीमधून विक्रीसाठी आणला होता. याप्रकरणी अब्दुल खालिद अब्दुल रशीद शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तो यापूर्वी चेंबूरला रहायला होता, तिथूनच त्याची तस्करांसोबत ओळख झाली असून, तो अमली पदार्थ विक्री करू लागला होता. त्याने गोवंडीमधून हे एमडी कामोठे परिसरात विक्रीसाठी आणले होते.





