तळवली येथे वैद्यकीय शिबीर

| खांब | वार्ताहार |

रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीच्या वतीने तळवली येथे मंदिर सभागृहात 31 रोजी मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. डॉ.आर.एन.पाटील सूरज हॉस्पिटल सानपाडा नवी मुंबई यांच्या सहयोगाने व ग्राम पंचायतीच्या वतीने या शिबीरीचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय शिबिरा प्रसंगी सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, सदस्य दयाराम मरवडे, अनघा खांडेकर, अर्जुन कचरे, नाना शिंदे, मारूती खांडेकर, वसंत मरवडे, खेळू मरवडे, रामचंद्र मरवडे, नामदेव मरवडे, रामचंद्र बामणे, वासुदेव मरवडे, राम शेलार, देवजी मरवडे, एकनाथ मरवडे, नंदू मरवडे, अनंत मरवडे, निलेश मांगुळकर, राजेंद्र मरवडे, मारूती बामणे, किसन बामणे, निलेश नाकटे आदी उपस्थित होते. या शिबिरात मेंदूंचे आजार मणक्याचे आजार मानसिक विकार व हृदयविकार आदी आजारांवर डॉ. उत्तम म्हस्के, डॉ.अंजली पाटील, डॉ. विनोद म्हात्रे, डॉ. महेंद्र म्हात्रे, धनराज सुळे, प्रशांत पाटील, रोशनी जाधव, प्रियंका जाधव, रिंकल घाटवळ, अण्णा सुर्वे आदी तज्ञांकडून रूग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version