| चिरनेर | वार्ताहर |
ओएनजीसी उरण प्लांटतर्फे नागाव ग्रामपंचायत, उरण येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ओएनजीसीचे प्लांट मॅनेजर सुभोजीत बोस यांच्या हस्ते वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य कार्यालय रायगडचे प्रतिनिधी डॉ. राजा चव्हाण आणि हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर एलिस जयकर यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
परिसरातील सुमारे 600 लोकांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. ओएनजीसी आयोजक संघाचे नेतृत्व डॉ. संजीव पोटदुखे इन्चार्ज मेडिकल उरण आणि श्रीमती डॉ. भावना आठवले प्रभारी एचआर उरण. नागावचे सरपंच चेतन गायकवाड म्हातावलीच्या सरपंच रंजना पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील स्वयंसेवकांच्या पथकाने शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.