। खेड। प्रतिनिधी ।
हिंद मराठा महासंघाचा सूरत येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यास राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड, उपाध्यक्ष अॅड. आनंदराव भोसले, सचिव शिवाजीराव पालांडे गुजरात राज्य अध्यक्ष देवेश माने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे, बडोदे जिल्हा अध्यक्ष प्रदीप मोरे, कोकण प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण, मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय सावंत, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम, राष्ट्रीय सल्लागार हेमंत शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश शेडगे, हरियाणा राज्य अध्यक्ष राम नारायण मराठा आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी सूरत शहर अध्यक्ष राजू शेवाळे यानी पद भूषविले तर या वेळी गुजरात राज्य सरचिटणीस पदी उद्योजक विजय कदम तर दक्षिण गुजरात प्रमुख पदी विराज सुर्वे यांची निवड करण्यात आली







