। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाची मध्यवर्ती समितीची बैठक नुकतीच सांगोला येथे पार पडली. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 29) पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भाग्यलक्ष्मी हॉल चेंढरे, अलिबाग येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
या मेळाव्यात शहरातील सर्व शेकाप महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकरत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.
अलिबागमध्ये होणार शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा
