स्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक संपन्न

। पनवेल । वार्ताहर ।
रेल्वे प्रशासनाच्यावतीने स्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटीचे सेक्रेटरी जे पी मीना उपस्थित संपन्न झाली. यावेळी स्थानक परिसरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा प्रश्‍न, शौचालयातील अस्वच्छता, रिक्षांची होणारी गर्दी, वाहतुकीचा उडणारा बोजवारा, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न,अशा विविध समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाला अवगत करण्यात आले. या बैठकीसाठी डॉ. भक्ती कुमार दवे, अभिजीत पाटील, जे पी मीना, सुधीर कुमार, श्रीकांत बापट, यशवंत ठाकरे, निलेश जोशी, मंदार मधुकर दोंदे, विलास दातार, मधुकर आपटे, रमेश जानोरकर, संतोष पाटील,सुनील रानडे, सरिता पाटणकर, डी के गुप्ता, गौतम अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version