महिला दक्षता समितीची बैठक

| पनवेल | वार्ताहर |
पोलीस रेजिंग डे सप्ताहांतर्गत शुक्रवारी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी मागर्दर्शन केले.

या बैठकीस मागर्दर्शन करताना विजय कादबाने यांनी सांगितले की, पनवेल परिसरातील शाळेतील मुलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्‍न सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार यासंदर्भात सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महिला दक्षता समितीनेसुद्धा लक्ष घालावे व ज्या ठिकाणी गरज पडेल तिथे पोलिसांचीसुद्धा मदत घ्यावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले. या बैठकीस महिला दक्षता समितीच्या 11 महिलांसह मसपोनि मोनाली चौधरी, सहा पो. उपनिरीक्षक संजय धारेराव व पो. हवा. गौतम भोईर आदी उपस्थित होते.

Exit mobile version