। उरण । प्रतिनिधी ।
जगद्गुरु श्री देवनायकाचार्य बिपिन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्ट व श्री साई मंदिर साईनगर वहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत वहाळ पनवेल येथे आरोग्य व मोफत तपासणी शिबीर, हेल्थ कार्ड, आयुष्यामान भारत कार्ड शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील सुनील मिश्रा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांनी अन्न पदार्थ संदर्भात अन्नाची निगा कशी राखावी, कोणते अन्न चांगले, कोणते अन्न खराब असते. अन्न पदार्थची ओळख उपस्थितांना करून दिली.