विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

| सोगाव | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मापगाव हद्दीतील दहावी, बारावी, पदवीधर, सीबीएसई, आदी शैक्षणिक क्षेत्रात भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे व त्यांच्या परिवारातर्फे रविवारी (दि.23) टाकादेवी-बहिरोळे येथील सुमती शिक्षण मंडळाच्या सभागृहात गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, मापगाव राजिप मतदारसंघाचे माजी सदस्य काका ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, चांदोरकर, श्रीधर घरत, सीताराम कवळे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, उपसरपंच राकेश पाटील, सुरेश गुरव, उनीता थळे, सानिका घाडी, शलाका थळे, संजय शिंदे, चंद्रकांत खोत, किशोर सातमकर, अनिल जाधव, सचिन घाडी, लक्ष्मी नारायण विद्यामंदिर टाकादेवी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच, त्यांचे पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version