विघवलीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

। माणगाव । प्रतिनिधी ।

दहावी बोर्डाच्या शालांत परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विघवली गावातील विद्यार्थ्यांचा विघवली ग्रामस्थ व सरपंच वैष्णव साठे यांच्या हस्ते शुक्रवार (दि.31) मे रोजी सत्कार करण्यात आला. गावातील वेद भाऊ सापळे 93.60%, सुयश समीर सालदूर 89.20%, आदिष्ठ संदीप खानविलकर 84.60%, मानसी किशोर खानविलकर 78.60%, समीक्षा सचिन सापळे 76.20%, यश मनोज बेंडखले 75.60%, सापळे श्रिया विकेश 72%, प्रथमेश गणेश सापळे 71% यांनी दहावी परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ, महिला मंडळ व सरपंच वैष्णव साठे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version