गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ

। नेरळ । वार्ताहर ।

नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या हाजी लियाकत इंग्लिश हायस्कूलचे प्रांगणात उड्डाण-5 या वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला होता. या स्नेह संमेलनामध्ये एचएलईएस संस्थेच्या बेबी एंजल, हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम स्कूल आणि हाजी लियाकत सीबीएसई स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी लियाकत हनीफ सय्यद, रंगूनवाला, अलनास जकारिया, नितीन सावंत, दाऊद सय्यद, अब्दुल रहमान सय्यद, शशिकला परदेशी, नुरी मुकादम आदी उपस्थित होते. तसेच, एचएलईएस या शाळेची दारे आर्थिक कारणाने शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खुली असतील, असा विश्‍वास संस्थेचे अध्यक्ष हाजी लियाकत हनीफ सय्यद यांनी बोलताना व्यक्त केला.

या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या चित्रकला, कार्टून काढणे, उत्कृष्ट हस्तक्षर, ग्रीटिंग कार्ड बनविण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. या शाळेचे विद्यार्थी आंतरराष्ट्रिय पातळीवरील ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झाले होते. त्या स्पर्धेतील जीके, सायन्स, इंग्लिश आणि गणित ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version