। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील विद्या मंदिर शाळेत दरवर्षी आंतर विद्यालय नाडकर्णी आजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी या वक्तृत्व स्पर्धेत कर्जत, खालापूर आणि अंबरनाथ या तीन तालुक्यांतील 14 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात नेरळ विद्या मंदिर, विद्या विकास मंदिर, शार्विल सीबीएसई, हाजी लियाकत सीबीएसई, हाजी लियाकत इंग्लिश मिडीयम, कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुल, विद्या विकास वांगणी, शारदा मंदिर कर्जत, प्राचार्य गव्हाणकर माथेरान, प्रगती विद्यालय कळंब, खालापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद शाळा वावोशी, शेंडे पाटील विद्यालय, ओमकार विद्यालय या शाळांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद पोतदार, कार्यकारिणी सदस्य सुशांत बदल, आयोजक मुख्याध्यापक पी.बी. विचवे, उपमुख्याध्यपक गिरासे, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिल्पा लाड, आर.बी. बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. या वक्तृत्व स्पर्धेसाठी दोन विषय देण्यात आले होते. त्यात ‘माझे आवडते पुस्तक’ तसेच वादविवादासाठी ‘कुत्रिम बुद्धिमत्ता शाप कि वरदान’ हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नीता गायकर, अनिल कवठेकर, रमाकांत साखरे आणि प्रेम जाधव यांनी काम पहिले.
स्पर्धेचा निकालः
वरिष्ठ गटात देविका कर्णिक प्रथम क्रमांक, दक्षता डुकरे द्वितीय क्रमांक, नम्रता बुर्डेकर तृतीय क्रमांक, तसेच गीत भंडारे याला उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले. तर, लहान गटात मनाली यमगेकर प्रथम क्रमांक, आरोही गाडे द्वितीय क्रमांक, पूजा पाटील व अनुष्का मोरे तृतीय क्रमांक, तसेच, संदेश कोल्हे याला उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.