। अलिबाग । वार्ताहर ।
स्व. सुशिला सखाराम पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्त्त साधून श्री समर्थ विचार फाऊंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व साहित्यकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. सर्व साहित्यिकांनी या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांतर्फे आव्हान करण्यात आले आहे. या काव्य लेखन स्पर्धेसाठी ‘माझी आई’, ‘आई माझे दैवत’, ‘आईविना घर खाली’ असे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अॅड. रत्नाकर पाटील (9420325993) व नवनाथ ठाकुर (9833584052) यांच्याशी संपर्क साधावा.