राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मिडलाईन कर्जत उपविजेता

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन हुतात्मा किसन अहिर विद्यालय क्रीडांगण वाळवा जिल्हा सांगली येथे हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा यांनी आयोजित केले होते.


या स्पर्धेत पुणे, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे रायगड जिल्ह्यातील आमंत्रित 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना चेतक पुणे विरुद्ध मिडलाईन कर्जत या दोन संघांमध्ये झाला. या अटीतटीच्या अंतिम लढतीत राजू देशमुख, सुयोग गायकर, हर्षद खुटकर, प्रतीक बैलमारे, प्रशांत जाधव, वैभव मोरे या मिडलाईन कर्जतच्या खेळाडूंनी मार्गदर्शक भगवान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला बहारदार खेळ केला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक चेतक पुणे या संघास रोख रक्कम 50 हजार व चषक, द्वितीय क्रमांक मिडलाईन कर्जत 30 हजार व चषक, तृतीय क बाबुराव चांदोरे नांदेड 20 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक इस्लामपूर व्यायाम शाळा सांगली 15 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वात्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट चेतक ढोकले (पुणे) चढाई करणारा प्रशांत जाधव (मिडलाईन कर्जत) तर उत्कृष्ट पक्कड प्रतिक बैलमारे (मिडलाईन कर्जत) यांना आकर्षक बक्षिसे आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version