| सांगली | वृत्तसंस्था |
चांदोली धरणाच्या परिसरात बुधवारी (दि.24) पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे धरणाला कोणतीही हानी झाली नसून धरण सुरक्षित असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. आज पहाटे 4.46 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला वारणावती येथील भूकंप मापन केंद्रावर याची तीव्रता 3 रिश्टर नोंदली गेली असून यामुळे कोणतीही हानी झालेली नाही. भूकंपाचे केंद्र मापन केंद्रापासून आठ किलोमीटर होते. पावसाने विश्रांती घेतलेल्या काळात हा भूकंपाचा धक्का बसल्याने काही नागरिक घराबाहेर पडले होते.