। कोलाड । वार्ताहर ।
मला कोलाड येथे काम मिळाले आहे, असे आपल्या मुलीला सांगून घराच्या बाहेर निघून गेलेली महिला 12 वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याची घटना वरसगाव हद्दीत घडली आहे. निशा अमित दरीपदर (35) तसेच मुलाचे नाव आर्यन अमित दरीपदर (12) रा. वरसगार्वें मनीषा अपार्टमेंट कोलाड असे आहे. रंग गोरा अंगाने सडपातळ, उंची सुमारे 5 फूट 4 इंच चेहरा उभट, केसांचे ठेवण साधी, अंगाची नेसुस आकाशी रंगाची टॉप, लाल रंगाची लेगीज, कानात सोन्याचे 2 ग्रामचे टॉप्स, नाकात पांढरा खडा असलेली फुल्ली, कपाळावर टिकली, तर मुलगा आर्यन अमित दरीपदर याचा रंग गोरा, अंगाने सडपातळ,उंची सुमारे 3 फूट चेहरा गोल,केसांचे ठेवण साधी,अंगाची नेसुस राखाडी रंगाचा हाफ हाताचा टी-शर्ट, हिरव्या रंगांची थ्री-फोर्थ पॅट उजवे डोळ्याचे खाली गालावर जुनी जखम, गळ्यात सोन्याचे चकोणी अकाराचे लॉकेट त्यावर गणपतीचे चित्र. तरी अशा वर्णाची महिला व मुलगा कुठे आढळल्यास कोलाड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आहवान पोलिसांनी केले आहे.