खरवलीतून तरुणी बेपत्ता

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील खरवली गावातील 18 वर्षीय तरुणी राहते घरातून बेपत्ता झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. सदरची घटना शनिवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद शांतीसागर विठ्ठल जाधव (वय-51) रा. खरवली यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि घटनेतील फिर्यादी शांतीसागर विठ्ठल जाधव यांची मुलगी तन्वी शांताराम जाधव ही राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. ती अद्यापपर्यंत घरी आलेली नाही. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यावर ती हरविल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. तरुणीचे वर्णन तन्वी शांताराम जाधव (वय-18), रंगाने गोरी, अंगाने मध्यम, चेहरा गोल, डोळे काळे, उंची सुमारे 5 फूट आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व पोलीस उपनिरीक्षक भोजकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत. सदरची तरुणी कोणाला आढळल्यास तापसिक अंमलदार पोलीस हवालदार सानप मो.नं. 9637286378 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version