माथेरानमध्ये पाणीवाटपात दुजाभाव

जनार्दन पारटे यांचा आरोप

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांसाठी उल्हास नदीवरून पाणीपुरवठा होतो. त्याचवेळी माथेरान शहरात असलेल्या शार्लोट लेक येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे पहिले 15 दिवस साधारण नागरी वस्तीमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यावेळी माथेरानमधील हॉटेल व्यावसायिकांना मुबलक पाणी देण्यात येते, असा दरवर्षी आरोप होतो. मात्र, माथेरान शहरात पाणीपुरवठा करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी केला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पार्टे यांनी निवेदन दिले असून, त्यात माथेरान शहरात हॉटेल्स आणि नागरी वस्ती असा दुजाभाव पाणी वितरण करताना केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी पार्टे यांनी आपली भूमिका मांडताना हॉटेल्स यांना कशाप्रकारे जादा पाणी पुरवले जाते याची माहिती दिली आहे. माथेरानमध्ये पाणी वितरण करताना दुजाभाव केला जातो. याचे स्पष्टीकरण करताना 2011 साली झालेल्या जनगणेनुसार माथेरान येतील स्थानिक नागरिकांची लोकसंख्या ही 5039 इतकी होती. माथेरान येथील सर्व स्थानिक नागरिकांना दरडोई मुबलक प्रमाणात 100 लीटर पाणी दिले, तर पाच लाख लीटर पाणी दिले जाते. मग उरलेले 10 लाख लीटर पाणी कोठे जाते. याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीने जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

सध्या माथेरानमधील दाट वस्तीत एक ते सव्वा तास अत्यंत कमी दाबात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक घरगुती कनेक्शनधारकांना जेमतेम 500 लीटर पाणी मिळते. त्यातसुद्धा दर मंगळवार आणि बुधवारी गावातील काही विभागातील पाणीकपात केली जाते. त्यावेळी पाणी मुबलक प्रमाणात मोठ्या हॉटेलधारकांना दिले जाते. याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा जनार्दन पार्टे यांनी केला आहे. माथेरानमधील नागरिकांना किरकोळ प्रमाणात पाणी दिले जाते. त्यांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविले जाते, त्याला जनार्दन पार्टे यांनी विरोध आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकारण आणि खासगी ठेकेदार हे माथेरानमध्ये पाणी वितरण करताना दुजाभाव करतात हेच यावरून सिद्ध होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

Exit mobile version