महाड चवदार तळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा गैरवापर

बहुजन समाज संघटनेकडून चोकशीची मागणी
। महाड । प्रतिनिधी ।
महाड येथील प्रसिद्ध चवदार तळे परिसरामध्ये उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. या सभागृहाला आणि चवदार तळ्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्या करीता दररोज हजारो भिमसैनिक या परिसराला भेट देतात. सभागृह आणि तळ्याचा परिसर अधिक स्वच्छ ठेवण्यात यावा त्याचबरोबर गैरवापर थांबविण्यात यावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपेश जाधव यांनी केली आहे.
चवदारतळे परिसराचा गैरवापर केला जात असल्याचे देखिल जाधव यांनी निदर्शनाला आणुन दिले. सभागृहामध्ये गेल्या काही दिवसापासुन सफाई कामगारांच्या निवासाची व्यवस्था पालिका प्रशासनाने केली असुन या कामगारांकडून सभागृह स्वच्छ राखला जात नाही, तसेच सभागृहाचे पावित्र राखले जात नाही. सभागृहाचा परिसर हा भंगाराचे गोदाम करण्यात आले आहे. पालिकेच्या टाकाऊ वस्तु सभागृहाच्या मागिल भागांत टाकण्यांत येतात त्या मुळे या परिसरांमध्ये दुर्घधी देखिल पसरली असल्याने नागरिकांना देखिल त्रास सहन करावा लागत आहे. हा विषय अत्यंत गंभीर असुन आपण पालिकेचे विरोधी पक्षनेते सुनिल आगरवाल यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबतील पालिकेने त्वरीत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अखिल महाराष्ट्र बहूजन सेनेचे अध्यक्ष दिपेश जाधव यांनी दिला आहे.

Exit mobile version